३००० वर्षे प्राचीन शिल्पकृती मुंबईत दाखल | गोष्ट मुंबईची - भाग १३८

2023-12-09 25

भारत, इजिप्त, ग्रीक, रोमन आणि असेरीयन या जगातील प्राचीन संस्कृती मानल्या जातात. किमान तीन हजार वर्षांचा इतिहास या सर्व संस्कृतींना आहे. या सर्व संस्कृती एकमेकांशी जोडल्या गेल्या होत्या त्या व्यापाराच्या माध्यमातून. पण विनिमय हा काही फक्त व्यापारी वस्तूंचाच होत नव्हता तर देवाणघेवाण संस्कृती आणि संकल्पनांचीही होत होती. प्राचीन संस्कृतींमध्ये आकारास आलेल्या या कलाकृती- शिल्पकृती आपल्याला त्या वैचारिक देवाणघेवाणीचेच पुरावे देतात. मानवी श्रद्धांशी संबंधित संकल्पनांचे खूप मोठ्या प्रमाणावर आदानप्रदान झालेले दिसते. त्या सुफलन- समृद्धीशी संबंधित जशा आहेत तशाच त्या अशुभ आणि रोगराईशीही संबंधित आहेत. जगभरातील या प्रमुख शिल्पकृती आता थेट मुंबईत आल्या आहेत.

Videos similaires